संजय जाधव यांचा खलनायकी अंदाज

3

सामना ऑनलाईन, मुंबई

चित्रपटाची फ्रेम अन् फ्रेम बोलतं करण्याचे कसब असणाऱ्या संजय जाधव यांची अभिनयाची इनिंग सध्या जोरात आहे. सिनेमॅटोग्राफी, लेखन, दिग्दर्शन केल्यानंतर आता अभिनयाचे कौशल्य दाखवण्यासाठी जाधव सज्ज झाले आहेत. आगामी लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि. प्रस्तुत आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ या चित्रपटात ते खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

निर्माता जयंत लाडे अस्सल मातीतला कबड्डी खेळ आपल्यासाठी घेऊन येत आहेत. खेडय़ातील उडाणटप्पू विद्यार्थी ते साहसी कबड्डीपटू असा रोमहर्षक प्रवास दाखवणाऱ्या ‘सूर सपाटा’मध्ये संजय जाधव एक सरप्राईज एलिमेंट ठरतील. राष्ट्रीय पुरस्कार किजेता बालकलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटकर्धन, रूपेश बने, जीकन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनाकणे आणि निनाद तांबाकडे आदींच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. ‘सूर सपाटा’ 22 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.