मोबाईलच्या घोळावर नाटक

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत मुंबई केंद्रामधून प्रथम क्रमांकाने निवडून आलेले प्रायोगिक रंगभूमीवरील ‘भाव ‘अ’ पूर्ण श्रद्धांजली’ मराठी हे नाटक ‘पारिजात’ या सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारी रात्री ८.३० वाजता माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाटय़मंदिरात रंगणार आहे. तंत्रज्ञानाची भुरळ नवीन पिढीला पडलीय.

भविष्यात या तंत्रज्ञान आणि मोबाईलमुळे काय घोळ होऊ शकतात. यावर प्रकाश टाकणारं हे नाटक आहे. दीपेश ठाकरे, वैष्णवी आंबिले यांसह पारिजातमधील काही कलाकारांच्या यामध्ये भूमिका आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील पाथरे यांना राज्य नाटय़ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.