अँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट यांचा घटस्फोटाचा निर्णय मागे

सामना ऑनलाईन । मुंबई

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जॉलीने आपला पती ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. २०१६ साली सप्टेंबरमध्ये अँजेलिना आणि ब्रॅड पिटने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि घटस्फोटासाठी अर्जही केला होता.

पती ब्रॅडच्या व्यसनांमुळे हैराण होऊन अँजेलिनाने हे पाऊल उचलले होते. लॉस अॅजोलिसला जात असताना ब्रॅडने विमानात दारू पिऊन मुलगा मॅडॉक्ससोबत वाद घातला होता. ब्रॅडच्या या सवयींना अँजेलिना कंटाळली होती. त्यामुळे तीने घटस्फोट घेण्याचं टोकाचं पाऊल उचललं. त्यासोबतच अँजेलिनानं त्यांच्या सहा मुलांचा ताबाही घेतला. याप्रकारानंतर ब्रॅडने व्यसन सोडण्यासाठी उपचार घेतले आहेत. त्यामुळे आता अँजेलिनानं ब्रॅडसोबतचा घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला आहे.