किल्लारीत विवाहितेचा दगडाने ठेचून खून


सामना प्रतिनिधी । किल्लारी

औसा तालुक्यातील किल्लारी येथे दि 12 जून रोजी एका गेल्या वर्षी विवाह झालेल्या विवाहितेचा दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नवीन किल्लारीच्या सहारावाडीच्या कोपऱ्यात एका शेतात लिंबाच्या झाडाखाली विवाहित महीलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना मयताची ओळख पटली असून ती शिवपुर ता.शिरुर अनंतपाळ येथील रहिवासी असून तिचा विवाह गेल्याच वर्षी किल्लारीच्या संदीप सगर यांच्या सोबत झाला होता. आज ती मृतावस्थेत तिच्या पतीच्या शेतात आढळून आली मोठ्या दगडाने तिचा चेहरा ठेचून तिचा खून करण्यात आला आहे. या खूना मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.