विवाहित महिलेला आवडला ‘पब्जी पार्टनर’, नवऱ्यासोबत घेणार घटस्फोट

388

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

ऑनलाईन मोबाईल गेम जगतात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या पबजी या खेळामुळे अनेकांचे जीव गेलेत. पण आता हा गेम लोकांच्या संसारातही आग लावत असल्याचं उघड झालं आहे. कारण, गुजरातमधील एका विवाहितेने पब्जी पार्टनरशी लग्न करण्यासाठी घटस्फोटाची मागणी केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचं वय 19 वर्षं इतकं आहे. 18व्या वर्षी तिचा विवाह एका बांधकाम व्यावसायिकासोबत झाला. तिला एक मूलही आहे. काही काळापूर्वीच महिलेला पब्जी खेळायचा नाद लागला. तो खेळ तिला इतका आवडला की हळूहळू तिला पब्जीचं व्यसन लागलं. त्यात तिला एक गेमिंग पार्टनरही मिळाला. त्याच्यासोबत ती रोज चॅटिंग करू लागली आणि तिला तो आवडू लागला. त्याच्यासोबत वेळ घालवल्याने तिचं पतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं. त्यावरून महिलेचे पतीसोबत वाद होऊ लागले. शेवटी महिलेने तिचं घर सोडलं आणि माहेर येऊन राहू लागली. तिने महिलांसाठीच्या हेल्पलाईनला फोन करून आपलं मनोगत सांगितलं. तिला तिच्या पतीपासून घटस्फोट हवा असून गेमिंग पार्टनरसोबत विवाह करायचा असल्याचं तिने फोनवरून सांगितलं.

फोनवरून समुपदेशन करणाऱ्या व्यक्तिने तिला पुनर्विचार करायला सांगितला आहे. इतक्या घाईघाईने निर्णय घेऊन आयुष्य पणाला लावू नये, असंही समुपदेशकाने महिलेला सांगितलं आहे. तसेच, पब्जीचं व्यसन सोडवण्यासाठी मानसोपचार घेण्याचा सल्लाही महिलेला देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या