विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला, कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगावातून ३ नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेल्या प्रियांका प्रमोद सिनगर (२२) यांचा मृतदेह एका विहिरीत आढळला. ही आत्महत्या आहे की हत्या?, याचा तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

याआधी प्रियांका यांचे सासरे बाळासाहेब अहिलाजी सिनगर यांनी सून ३ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तपास सुरू असतानाच प्रियांका यांचा मृतदेह कोपरगावातील एका विहिरीत आढळला. दरम्यान, तपास पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; अशी भूमिका प्रियांकाच्या माहेरच्यांनी घेतली आहे.