नवऱ्याचे शतक अन् बायकोची मुलाखत, क्रिकेटच्या मैदानात घडला अनोखा प्रकार

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंड आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमानांनी 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टीलने दमदार शतक झळकावले. गप्टीलचे हे एक दिवसीय कारकीर्दीतील 15 वे शतक होते. या खेळीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कारही देण्यात आला.

सामना संपल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात एक अनोखा प्रकार दिसून आला. गप्टीलला सामनावीरचा पुरस्कार मिळाल्यानंतर मुलाखत घेण्यासाठी दुसरी तिसरी कोण नाही तर त्याची पत्नी पत्रकार लॉरा मॅक्गोल्डरिक ही समोर आली. यावेळी पत्नीने गप्टीलला दमदार शतकासाठी शुभेच्छाही दिल्या. यासह तिने सामन्यासंबंधी काही प्रश्नही विचारले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 232 धावांपर्यंत मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने मार्टिन गप्टीलने 117 धावांची नाबाद खेळी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.