शहीद मेजर शशीधरन व्ही. नायर यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार


सामना ऑनलाईन । पुणे

जम्मू कश्मीरच्या राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी आयईडी स्फोटात शहीद झालेले मेजर शशीधरन व्ही. नायर यांचे पार्थिव शनिवारी पुण्यात आणण्यात आले. त्यांना पुण्यात मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्करी अधिकारी उपस्थित होते. मेजर शशीधरन यांच्या पार्थिवावर रविवारी वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.