Indian open boxing tournament – मेरी कोम 51 किलोमध्ये लढणार

3

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानची दिग्गज बॉक्सर मेरी कोम गुवाहाटी येथे 20 ते 24 मे या कालावधीत रंगणाऱ्या इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेसाठी सज्ज झालीय. लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणारी मेरीकोम या स्पर्धेत 51 किलो वजनी गटात लढणार आहे.

51 किलो वजनी गटात खेळण्यासाठी मी रेडी झालीय. सरावही चांगला झालाय. या स्पर्धेत खेळून मला माझी क्षमता कळणार आहे. तसेच यामुळे मी आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तयार होईन, असे याप्रसंगी मेरी कोम म्हणाली. या स्पर्धेत हिंदुस्थानचे 35 पुरुष आणि 37 महिला सहभागी होणार असून 16 देशांतील एकूण 200 बॉक्सर पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत.