…म्हणून आरामदायी मसाज कराच

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव वाढणं हा भाग ज्येष्ठ नागरिकांनाही चुकलेला नाही. त्यातच काम उभ्याने करायचं असेल तर मग विचारूच नका… अख्खं अंग दुखायला लागतं. मरगळ येते. मग काय करायचं तेच सुचेनासं होतं. नेमक्या याच वेळी शरीराला चांगल्या मसाजाची आवश्यकता असते.

– मसाजमुळे शरीरात तणाव निर्माण करणाऱ्या कार्टिलोस नावाच्या हार्मोनची मात्रा कमी होऊ लागते. मसाज केलात तर स्नायू मोकळे होतात आणि त्यातूनच डोकेदुखी, अंगदुखी यापासून आराम मिळतो.

– मसाजामुळे लठ्ठ माणसाच्या शरीरातील चरबी घटविता येणे शक्य आहे. यासाठी नियमितपणे मसाज केला तर शरीरातील ज्यादा चरबी बर्न होते. यामुळे लठ्ठपणा दूर व्हायला मदतच मिळते.

– शरीरात लवचिकता असेल तर वय कितीही वाढले तरी कामे झटपट होऊ शकतात. अशी लवचिकता मसाजाद्वारे मिळवता येते. मसाज नियमितपणे करत असाल तर स्नायूंचा कडकपणा कमी होतो.

– नियमित मसाज केल्यास शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा नीट होतो. यामुळे अर्थातच रक्तप्रवाह (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहातो. ब्लडप्रेशर आटोक्यात राहिले तर मग हृदयाचे ठोके नीट पडतात. म्हणून हृदयविकाराचा धोकाही दूर पळतो.

– ज्येष्ठ नागरिकांसाठी मसाज आणखी एका कारणासाठी फायद्याचा असतो. तो फायदा म्हणजे मसाज केल्यामुळे त्वचा चमकदार आणि आरोग्यपूर्ण राहाते. चेहऱ्यावर, अंगावर सुरकुत्या आल्या असतील तर नियमित मसाजमुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि रंगही उजळतो.

– बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना रात्री झोप नीट न लागण्याची समस्या भेडसावते. मात्र नियमित मसाज केला तर शरीराचे स्नायूंना आराम मिळून थकवा दूर पळतो. मग अर्थातच झोप छान लागते. दुसरे म्हणजे मसाज केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह नीट होऊ लागतो. याचा फायदा डायबिटीसच्या रुग्णांना होतो.