VIDEO: वसईत अग्नितांडव! 70 गोदामे जळून खाक

1

सामना ऑनलाईन । वसई 

वसईत बुधवारी रात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तुंगारेश्वर फाटयाजवळ आग लागून 60 ते 70 गोदामे जळून खाक झाली आहेत. जळालेली ही सर्व गोदामे प्लास्टिक आणि भंगारची होती. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली असून सध्या तिथे आगीची धग कमी करण्याचे काम सुरु आहे. या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

वसई विरार परिसरात सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामांचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे आग लागण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. बुधवारी रात्री आगीत भस्मसात झालेली सर्व गोदामे देखील अनधिकृत आहेत. दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीत भंगारची ने आण करणाऱ्या गाडया ही जळून खाक झाल्या आहेत.