बांगलादेशमधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार

23

सामना ऑनलाईन । ढाका

बांगलादेशची राजधानी ढाका येथे आज (शुक्रवारी) सकाळी झालेल्या चकमकीत दहशतवादी नुरूल इस्लाम मरजान ठार झाला. नुरूल मागच्या वर्षी (२०१६) ढाका येथील एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दहशतवादविरोधी पोलीस पथकाचे प्रमुख मोनीरूल इस्लाम यांनी नुरूल इस्लाम मरजान चकमकीत ठार झाल्याचे सांगितले. मध्यरात्री तीन वाजता मोहम्मदपूर येथे झालेल्या चकमकीत नुरूल ठार झाला. तो मरजान जमातुल मुजाहिदीन बांग्लादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता; अशी माहिती त्यांनी दिली.

मागच्या वर्षी १ जुलै रोजी ढाक्यातील गुलशान भागातल्या होली आर्टिजन नावाच्या बेकरीवजा कॅफेवर पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा पथकाने सर्व दहशतवाद्यांना ठार केले होते. दहशतवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात झालेल्या चकमकीत २४ नागरिक ठार झाले होते. मृतांमध्ये हिंदुस्थानची तारिषी जैन (१९) ही मुलगी होती.

आपली प्रतिक्रिया द्या