मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या शोक संदेशात खोडसाळपणा

सामना ऑनलाईन, नांदेड

भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे १ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून एक पत्र पाठवण्यात आले. शुभेच्छांनी सुरुवात झालेल्या या पत्राचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. हा सगळा प्रकार खोडसाळपणातून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.


मूळ पत्रामध्ये शुभेच्छा हा संदेश नसल्याचं राजेश संभाजी पवार यांच्या फेसबुक पोस्टवरून स्पष्ट झालं आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा सध्या शोध घेतला जात आहे. हा खोडसाळपणा करणाऱ्याविरोधात कारवाईची मागणीही केली जात आहे.