MSEBच्या दिरंगाईमुळे मुलीचा जीव गेला, विजेचा शॉक लागून मृत्यू

21
pooja-kurhe

सामना प्रतिनिधी । नगर

नगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाची मुलगी पूजा सुनील कुरहे हिचा पावसामुळे भिंतीत उतरलेल्या विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.

पूजा ही एमबीएचे शिक्षण घेत होती. पावसामुळे घरावरील पत्रे व भिंतीत करंट उतरला होता. चार दिवसांपूर्वीच विजेचा करंट लागत असल्यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. मात्र वीज वितरण महामंडळाकडे तक्रार करूनही दुरुस्ती झाली नव्हती असे सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या