अभिनेत्रीला अश्लील संदेश पाठवणाऱ्या विकृताला अटक

15

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

आभिनेत्रीला सोशल मीडीयावर अश्लील संदेश पाठवून तिला त्रास दिल्याप्रकरणी एका आरोपीला नवी मुंबईतून पकडण्यात आलं आहे. संदिप पांडे (३४)असं आरोपीच नाव असून तो अभिनेत्रीला तिच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अकांऊटवर अश्लिल संदेश पाठवत होता. अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याकडून त्याबाबतची तक्रार नवी मुंबई पोलीस ठाण्यात दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही अभिनेत्री भोजपुरी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत असून, तिचा नवरा उद्योगपती आहे. काही महिन्यांपूर्वीच संदिपला तिचा नंबर मिळाला होता. तेव्हापासून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती. संदिप अभिनेत्रीला तिच्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर अश्लील संदेश पाठवायचा. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या नवऱ्याने तिचे फेसबुक चेक केल असता त्याला तिच्या फेसबुक टाईमलाईनवर संदिपने पाठवलेले अश्लिल संदेश दिसले. त्याबाबत त्याने संदिपला समजावण्याचे ठरवले आणि त्याने संदिपला फोन केला. त्यावर संदिपने त्याच्यासोबत उद्धट बोलत त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर शनिवारी अभिनेत्रीने आणि तिच्या नवऱ्याने संदिप विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी संदिपच्या मोबाईलचा शोध घेत त्याला पनवेल येथे पकडले.

संदिप हा मॅकेनिक असून त्याच्यावर लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या