हवामान बिघडले; मेधा खोले यांची तक्रार मागे

सामना प्रतिनिधी । पुणे

‘सोवळे’ प्रकरणावरून हवामान बिघडल्याने डॉ. मेधा खोले यांनी पोलिसांत दिलेली तक्रार आज मागे घेतली आहे. घरगुती धार्मिक कार्यक्रमासाठी खोटे नाव सांगून स्वयंपाक करत निर्मला यादव यांनी फसवणूक केल्याची तक्रार खोले यांनी दाखल केली होती. तर निर्मला यादव यांनीही खोलेंविरोधात मारहाण केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आज डॉ. खोले यांनी तक्रार मागे घेतली.

फसवणूक केल्याबद्दल तक्रार केली होती, पण अशाप्रकारे या प्रकरणाला वेगळे वळण लागेल असे वाटले नव्हते, असे खोले म्हणाल्या.