विल्सन कॉलेज बीएमएस-होप्स कडून मुंबई टॅक्सी चालकांसाठी वैद्यकीय शिबीराचे आयोजन

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई टॅक्सी चालकांसाठी मुंबई टॅक्सी असोसिएशन, वोकहार्ट हॉस्पिटल आणि स्प्रेड स्माईल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विल्सन कॉलेज बीएमएस विभागात वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय शिबीरासाठी ३०० हून अधिक टॅक्सी चालक आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवला. शिबीरात संपूर्ण शरीर तपासणीसह ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल, ईसीजी, पीएफपी, डीआयईटी सल्ला, रक्तदाब, स्त्री-कुटुंब सदस्यांसाठी स्त्री-स्नायू चाचणी केल्या गेल्या.

विल्सन बी.एम.एस. च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरु डॉ. ज़ुलेका होमवाझर यांच्या नेतृत्वाखाली समाजातील कमी विशेषाधिकृत विभागात ५० मोतिबिंदू डोळ्यांची शस्त्रक्रिया केली. हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत करणारे मॅनेजमेंट स्टडीजच्या युवा आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थी, विल्सन कॉलेज यांनी मुंबईकरांची २४ तास सेवा करणार्‍या टॅक्सी चालकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते..

डॉ. जुलीका होमवझीर या आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या असून होपचे या संस्थेच्या संस्थापिका आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजने केले आहे. त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले की “मुंबईत गेली १०५ वर्षे टॅक्सी आपली सेवा देत आहेत, ओला आणि ऊबेर च्या कालखंडात टॅक्सी चालकांची प्रशंसा करण्यासाठी आम्ही या शिबीराचे आयोजन केले आहे.”