औषधी हळद

37

>> सामना टीम

घरात औषधी हळद असणे हे कायम फायद्याचे ठरते. वाचा काय आहेत हळदीतले औषधी गुणधर्म…

हळदीत असलेले ’करक्युमिन’ रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी आहे. शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

सततच्या डोकेदुखीने त्रासला असाल तर हळदीचे पाणी प्या. त्याने आराम मिळेल.

हळदीचे पाणी प्यायल्याने बुद्धी तल्लख राहते.

हळदीमुळे गुडघेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.

आहारात हळदीचा वापर जास्तीत जास्त केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

मासिक पाळीच्या तक्रारी असल्यास त्यांनी नियमित हळदीचे पाणी प्यावे. त्याचा फायदा होईल.

शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्या. पोट साफ होते.

वजन प्रमाणाबाहेर वाढले असल्यास ते कमी करणे महत्त्वाचे आहे. ते कमी करण्यासाठी घरच्या घरी पर्याय म्हणजे हळद. हळदीचे पाणी फायदेशीर ठरते.

जळजळ होत असेल आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हळदीच्या पाण्यामुळे जळजळ थांबते, पचनक्रिया सुधारते.

हळदीमध्ये एक अँटीऑक्सिडेंट आहे. ते कर्करोगाच्या कोशिकांना नष्ट करते. यामुळे कर्करोगाशी लढा द्यायचा असेल तर हळद फायदेशीर ठरते.

हळदीचे पाणी नियमित प्यायल्याने रक्त शुद्ध होते.

आपली प्रतिक्रिया द्या