औषधी धातू

> पितळी भांडय़ात अन्न शिजवल्याने आणि खाल्ल्याने जंत, कफ आणि वायूदोषाचे विकार होत नाहीत. फक्त सात टक्केच अन्नातील पोषकतत्त्वे नष्ट होतात.

> सोने उष्ण धातू आहे. सोन्याच्या भांडय़ात शिजवलेले अन्न शरीराला अंतर्बाह्य बलवान आणि मजबूत बनवते. सोने डोळ्यांचे तेज वाढवते.

> चांदी हा शितल धातू आहे. यामुळे शरीराला आतून थंडावा मिळतो. चांदीच्या पात्रात जेवल्याने आणि अन्न शिजवल्याने स्मरणशक्ती वाढते. डोळ्यांचे आरोग्य वाढून त्यांचे तेज वाढते. शिवाय पित्तदोष, कफ आणि वायूदोष नियंत्रणात राहतो.

> लोखंडाच्या भांडय़ात बनवलेल्या अन्नातून शरीरातील लोहतत्त्व वाढते.  लोहामुळे बरेच रोग नष्ट होतात. अंगाला येणारी सूज, पिवळेपणा, पांडुरोग, काविळ असे बरेच आजार बरे होतात. या धातूच्या ग्लासात दूध पिणे आरोग्य चांगले, मात्र लोखंडाच्या भांडय़ात जेवू नये त्यामुळे बुद्धिचा नाश होऊन स्मरणशक्ती कमी होते.

> ऍल्युमिनियम बॉक्साईटपासून बनवले जाते. ऍल्युमिनियमच्या भांडय़ातील अन्न शरीराला मिळणारे आयर्न आणि कॅल्शियम थांबवते. यामुळे ऍल्युमिनियमच्या भांडय़ांचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करू नये. यामुळे हाडे ठिसूळ होतात. यकृताचे विकार आणि मानसिक आजार, क्षयरोग, दमा, मधुमेह यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ऍल्युमिनियमच्या प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवल्याने 87 टक्के पोषकतत्त्वे नष्ट होतात.