मी वेगळी : लेखणी माझी सखी

142

मीना जयंत अभ्यंकर

मी लग्न होऊन सासरी आले. आमचा वाडा मोठा, घरात आम्ही तिघेच जण… माझे मामंजी, मिस्टर आणि मी व आणखी एक मेंबर म्हणजे आमचा पाळीव कुत्रा. पण मला नुकतीच नोकरी सोडायला सांगून माझ्या मामंजींनी मला मगच होकार दिला होता. त्यामुळे मला रिकामपण फार जाणवत होते. घरातील सर्व कामे करून त्यानंतर काही दिवस शिवण क्लासमध्ये जाऊन शिक्षण घेतले. त्यानंतर गायन क्लास लावला. मात्र माझ्या मनाची तळमळ व छंदाची धडपड थांबली नव्हती. त्यातच माझ्या दूरच्या अपंग नणंदेच्या सासरी पैशासाठीच तिचा छळ करीत होते. ती हे मला सतत सांगत होती. हे सारे ऐकून माझे मन हेलावले. त्याचवेळी मला अचानक एक कथा स्फुरली व त्याचवेळी गृहलक्ष्मीच्या कथास्पर्धा होत्या. मी लिहिलेली कथा ‘निखळलेला तारा’ गृहलक्ष्मीला पाठवली आणि ती प्रसिद्ध झाली आणि मला लिखाणाचे वेड लागले. त्यानंतर अनेक प्रसंगांतून मला कथाबीजे मिळत गेली. आणि मी सतत लिखाण लिहीत गेले. आनंदाची बाब ही की मला अनेकांनी प्रसिद्धीचा मानही दिला तर वाचकांनी माझी दादही दिली. आजच्या या घडीला संसार सांभाळून दोन मुलांची शिक्षणे वगैरे पार पाडून मुलीचा संसार नीट लावून देऊन व नातवंडांची त्यात भर पडून मी माझ्या छंदाशी जोडलेलीच आहे. कुणाचे बोलणे, वागणे, हालचाली यांचा अभ्यास करीत व त्यांच्या प्रत्येक स्वभावाचे पैलू माझ्या लिखाणात कुठेतरी डोकावतातच. असा माझ्या लेखनाचा छंद गेली 30 वर्षे चालू आहे. अजूनही दिवाळी अंकांत कथा येतात.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱयांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता ः श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी,
मुंबई-25 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या