आज मुंबईच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक, मध्य रेल्वेवर नऊ तासांचा मेगाब्लॉक

57

सामना ऑनलाईन । मुंबई

आज रविवारी मुंबईच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर नऊ तासांचा मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होण्याची चिन्हे आहेत.

मध्य रेल्वेवर परळ उपनगरीय टर्मिनिसच्या कामानिमित्त भायखळा ते माटुंगा दरम्यान नऊ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकचा फटका लोकलच्या प्रवाशांसह एक्सप्रेसच्या प्रवाशांनाही बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरही नेहमीप्रमाणे मेगाब्लॉक असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या