रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसेवेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक बाबींची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल उशिराने धावतील. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत हा ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान सांताक्रुझ ते गोरेगाव जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील.

मध्य रेल्वे

रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घेण्यात येणार आहे. दरम्यान मुलुंडहून सुटणाऱ्या सर्व धीम्या आणि अर्ध जलद लोकल सकाळी 10.47 ते दुपारी 3.50 पर्यंत मुलुंड ते कल्याणपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील.

हार्बर रेल्वे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, अंधेरी, गोरेगाव या सेवाही बंद असतील.

summary- mega block on all three routes of mumbai railway