मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; हार्बरच्या प्रवाशांना दिलासा

36

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत रविवार आणि मेगाब्लॉक असं एक समीकरणच झालं आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. मात्र मेगाब्लॉक असल्याने त्यांना थोड्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे
रविवारी सकाळी १०.५४ वाजेपासून दुपारी ४.१९ पर्यंत कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या अप जलद गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसटीएमहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल निर्धारित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील.

पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी सकाळी १०.३५ वाजेपासून दुपारी ३.३५ पर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील रेल्वेसेवा धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. त्यामुळे त्या सर्व स्थानकांवर थांबतील.

आपली प्रतिक्रिया द्या