रेल्वेच्या दोन मार्गांवर आज मेगाब्लॉक

सामना ऑनलाईन । मुंबई

सुट्टी आणि मस्त पाऊस हे समीकरण अनुभवण्यासाठी तुम्ही जर बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकदा तरी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा. आज हार्बर व पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ही उशीराने धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगााव दरम्यान सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यानची अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वेसेवा सकाळी साडे दहा ते साडे तीन दरम्यान बंद राहणार आहे. या काळात हार्बरच्या प्रवाशांना त्याच तिकीटावर ट्रान्स हार्बर व मध्य रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.