मध्य-हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

5
ladies-local-train

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग आणि हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे टर्मिनस दोन्ही मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 वाजेदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकल विलंबाने धावणार आहेत. कल्याण ते कसाऱ्यादरम्यान पादचारी पुलाच्या कामासाठी कल्याण ते कसारा अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गवर ब्लॉकच्या काळात सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल दिवा ते परळ दरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल गाडय़ांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर्स गाडी दिवा स्थानकापर्यंतच धावेल आणि दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी गाडी सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दादर स्थानकातून दुपारी 3.40 वाजता विशेष लोकल सोडण्यात येईल. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे टर्मिनस दोन्ही मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 वाजेदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

शहाडमधील पुलाचे गर्डर पाडणे, टिटवाळा स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकणे, आसनगावमधील पादचारी पूल पाडणे, तानशेत स्थानकात नवीन पादचारी पुलाच्या कामांसाठी कल्याण ते कसारा दरम्यानही अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान अप व डाऊन मार्गावरील गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या