आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

3

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेवर मुलुंड आणि माटुंगा दलद अप मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत ब्लॉक आहे. यादरम्यान ठाण्यावरून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट लोकल सकाळई १०.५९ ते दुपारी ४.२० पर्यंत मुलुंड आणि परळदरम्यान अप स्लो मार्गावरुन चालवण्यात येतील. सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या सर्व मेल/एक्स्प्रेस मेगाब्लॉक दरम्यान मुलुंड आणि माटुंगा अप स्लो मार्गावर वळविण्यात

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकामध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजपर्यंत अप आणि डाऊन फास्ट अशा दोन्ही मार्गांवर ब्लॉक चालणार आहे. या कालावधीत सर्व अप फास्ट लोकल विरार/वसई ते बोरिवलीपर्यंत अप स्लो आणि बोरिवली ते वसई/विरारपर्यंतच्या फास्ट लोकल स्लो मार्गावर चालतील.