रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

फोटो- संग्रहीत

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान, हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे स्थानकादरम्यान तर पश्चिम रेल्वे बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे आहे. दरम्यान जलद लोकल स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे स्टेशनदरम्यान सकाळी ११.२१ ते ४.३९ या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल या काळात बंद राहणार आहेत. तसेच सकाळी १०.३८ ते ४.४३ याकाळात सीएसटीकडून अंधेरी आणि वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्याही या काळात बंद असतील.

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते भाईंदर या रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्रीपासून जलद रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी ११.३० ते रविवार दुपार ३.३० या काळात सर्व जलद लोकल स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.