‘या’ मालिकेतील अभिनेत्रीला माहीत नव्हते तिचा २ महिन्यांतच होणार मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई

‘ना आना इस देश मै लाडो’ या मालिकेच्या दुसऱ्या सीजनमध्ये अम्माजीची एन्ट्री दमदार झाली परंतु दोन महिन्यातच त्यांची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. या गोष्टीचा धक्का प्रेक्षकांना तसेच अम्माजींची भूमिका सारकारणाऱ्या अभिनेत्री मेघना यांना सुद्धा बसला.

मेघना यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या बाबत अनेक गैरसमज पसरवण्यात आले आहेत. मी शुटींगसाठी वेळेवर येत नाही. मला मालिकेतून एक्झिट घ्यायची नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु या सर्व गोष्टी खोट्या असून मला व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे मी काही दिवसांपासून गैरहजर होते. आजरपणामुळे मला काम करणे शक्य नव्हते. याची कल्पना माझ्या टीमला मी दिली होती. मी या क्षेत्रात १९ वर्षांपासून काम करत आहे. मी स्वतः शो असा अर्ध्यातच सोडू शकत नाही. मात्र कार्यक्रमातील माझ्या भूमिकेचा मृत्यू होणार असेल, तर मी पुढे शुटिंगही करू शकत नाही.

मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता, मालिकेतील माझी भूमिका फार लहान असल्याचे मला आधी सांगण्यात आले नव्हते, असे त्यांनी सांगितले. ‘येथे संपूर्ण जग गरजेवर सुरू आहे. आपल्यालाच समजायला हवे, जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे.’ असेही त्या म्हणाल्या.