यासिन मलिक आजारी, त्याला तत्काळ सोडा; मेहबूबा मुफ्तींना आाला फुटिरतावाद्यांचा कळवळा

1

सामना ऑनलाईन । जम्मू

टेरर फंडिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख व फुटिरतावादी नेता याची तत्काळ सुटका करा अशी मागणी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. मेहबूबा यांनी यासिन मलिकसोबत सर्व फुटिरतावाद्यांना सोडण्याची मागणी देखील केली आहे.

‘प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर अनेक आरोप असतानाही त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच यासिन मलिकला देखील तत्काळ सोडा. त्याची तब्येत देखील ठिक नाही. तसेच जमात ए इस्लामीच्या इतर सदस्यांची देखील सुटका करा, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. पुलवामा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याच्या न्यायालयीन कोठडीत आज दिल्लीच्या पतियाळा न्यायालयाने वाढ केली आहे. यासिनची 24 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज यासिनला व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.