‘निर्धार शिवशाहीचा’आजपासून मोहीम

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त संभाजीनगर जिल्ह्यातील वज्रमूठ एकत्र करण्याच्या हेतूने ‘निर्धार शिवशाहीचा’मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवार, २ जानेवारीपासून या मोहिमेची सुरुवात गंगापूर तालुक्यातून होणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

निर्धार शिवशाहीचा या मोहिमेत प्राथमिक सदस्य नोंदणी, शिवसेना स्थापनेपासून आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी असणारी, परंतु सद्य:स्थितीत कार्यरत नसणारे जुने शिवसैनिक, शिवसेनेच्या अंगीकृत संघटना यांच्या समवेत गाव, वॉर्ड पातळीवरील विविध अडचणी आदी विषयांवर चर्चा, गाठीभेटी, विचारविनिमय करण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचा दौरा पुढीलप्रमाणे : गंगापूर तालुक्यात सकाळी ९ वाजता – पिंपरखेडा, १० वाजता – लांझी, ११ वाजता – वाळूज, १२ वाजता – लिंबेजळगाव, १ वाजता – जिकठाण, २ वाजता – टेंभापुरी, ३ वाजता – धामोरी, ४ वाजता – गुरुधानोरा, ५ वाजता – पेंडापूर, ६ वाजता – कोडापूर, झांजर्डी, ७ वाजता मांगोगाव व मुक्काम बोरुडी येथे करण्यात येणार आहे.

यावेळी उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे, महिला आघाडी जिल्हा संघटक आनंदी अन्नदाते, जिल्हा युवा अधिकारी संतोष माने यांनी केले आहे.