लवकरच येणार ड्रायव्हरविना धावणारी कार

2

सामना ऑनलाईन । बर्लिन

तंत्रज्ञानानं मानवाचं जीवन अधिक सुखकर केलं आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांचा वापर करताना आपण पाहतोच. ही वाहनं चालवण्यासाठी एका ड्रायव्हरची गरज असते, मात्र तुम्ही कधी ड्रायव्हर विरहित कार रस्त्यावरून धावताना पाहिली आहे का? नाही ना! पण येत्या १० वर्षात तुम्ही अशा कारमध्ये बसून प्रवास करू शकणार आहात.

 जर्मनीची इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनिअरिंग पॉवरहाऊस कंपनी बॉश आणि मर्सिडिज बेंझ मिळून संयुक्तपणे या कारवर काम करत आहेत. मर्सिडिज बेंझ ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठी पुरवठादार कंपनी आहे. कंपनीचं पुढील काळात एक दर्जेदार, स्वायत्त स्वयंचलित कार आणण्याचं स्वप्न आहे. पुढील दशकाच्या सुरुवातीला ही कार बाजारात उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
मर्सिडिज-बॉश कंपनीपाठोपाठ अनेक कंपन्या स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीमध्ये उतरल्या आहेत. कंपनीनं बनवलेल्या स्वयंचलीत वाहनाची चाचणीही घेण्यात आली आहे. कार कशा प्रकारे काम करेल याचा आराखडा बनवण्यात आला आहे. याच स्वयंचलित कारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात ही कार एका अंध व्यक्तिला घेऊन जाताना दिसत आहे. पाहा व्हिडिओ :