‘तांबडे बाबा’ पावले, मिलिंद शिंदेना म्हाडाचे घर लाभले!

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपट, टीव्ही मालिका, नाटक यामधून दिसणारे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना आज म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे. झी मराठीवरील ‘तू तिथे मी’ या मालिकेत मिलिंद शिंदे यांनी दादा होळकर ही भूमिका साकारली होती. त्यात ते सतत तांबडे बाबांची पूजा करताना दाखवले होते. त्यामुळे त्यांना घर लागल्याचं जाहीर होताच, शिंदेंना तांबडे बाबा पावले, अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त झाली.