आता मायकल फेल्प्स भिडणार शार्कसोबत

77

सामना ऑनलाईन । मुंबई

जगातला सर्वात वेगवान जलतरणपटू मायकल फेल्प्स आता पांढऱ्या शार्कसोबत भिडणार आहे. डिस्कव्हरी चॅनलच्या शार्क वीक या कार्यक्रमाअंतर्गत ही शर्यत होणार आहे. जगातला सर्वोत्तम जलतरणपटू जगातल्या सर्वोत्तम शिकाऱ्यासोबत शर्यत लावणार आहे. ३१ वर्षीय मायकल फेल्प्स २३ ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आहे आणि त्याने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर निवृत्ती स्वीकारली होती.

मायकलचा सर्वोत्तम वेग ६ मैल प्रतितास इतका आहे, तर शार्कचा वेग २५ मैल प्रतितास आहे. त्यामुळे ही शर्यत अत्यंत रंगतदार आणि चुरशीची असेल, यात शंका नाही. आता या शर्यतीसाठी कोणतं ठिकाण निश्चित केलं जाणार आहे, ते अजूनही गुलदस्त्यात आहे. २३ जुलै रोजी हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या