कोयना,संगमेश्वर परिसरात भूकंपाचे धक्के

सामना ऑनलाईन,संगमेश्वर

कोयना परिसरात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदवण्यात आली आहे. कोयना परिसराप्रमाणेच पाटण, सांगली या परिसरामध्येही हे धक्के जाणवले. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच कोकणातील संगमेश्वर, देवरुख परिसरातही हे धक्के जाणवल्याचं तिथल्या नागरिकांनी सांगितलं आहे.

संगमेश्वर परिसरात शुक्रवारी  पहाटे ५.२० वाजेच्या सुमारास हे धक्के जाणवले. पहाटे फिरायला बाहेर पडलेल्यांना तर हे धक्के जाणवलेच शिवाय झोपेत असलेल्यांनाही हे धक्के जाणवले. या हादऱ्यांमुळे नागरीक खडबडून जागे झाले. काही नागरीक घाबरून घराबाहेरही पडल्याचं स्थानिक वार्ताहराने कळविले आहे.