पुणे शहरात दुधाचा पुरवठा ‘अटला’

सामना प्रतिनिधी । पुणे

स्काभिमानी शेतकरी संघटनेच्या कतीने दूध दरप्रश्नी सुरू केलेल्या राज्यव्यापी दुधकोंडी आंदोलनामुळे पुण्यात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. चितळे डेअरी आणि कात्रज दुध संघाकडून अत्यल्प प्रमाणात पुरवठा सुरू आहे. राज्यातील इतर संघाकडून होणारा पुरवठाही घटला आहे. सध्या होणाऱ्या पुरवठय़ावर शहराची दररोजची दुधाची गरज भागणे शक्य नाही. आज शहरातील काही भागात कमी प्रमाणात दुधाचा तुटवडा जाणवला असला तरी आंदोलन सुरू राहिल्यास गुरूवारपासून पुणेकरांना दुध मिळणे अवघड होण्याची चिन्हे आहेत.

रकिकारी मध्यरात्रीपासून दूध संकलन बंद करत, दुधाची काहतूक करणारी वाहने अडकून, दूध फेकून देण्याचे आंदोलन सुरू केले आहे. ग्रामीण भागात आंदोलनाला जोर आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून शहराला होणारा दुध पुरवठा मोठय़ा प्रमाणात खंडीत झाला आहे. नगर, सोलापुर भागातूनही दुध पुरवठा कमी होत आहे. चितळे डेअरीचे संकलन पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे साठा केलेले दुध कमी प्रमाणात शहरात पाठविले जात आहे. पुणे जिह्याच्या ग्रामीण भागातून काही प्रमाणात दुध संकलन होत आहे. मात्र, कात्रज दुध संघाचे संकलन कमी होण्यास सुरूवात झाली असून दुध पुरवठाही कमी झाला आहे. आंदोलनाची तीक्रता वाढल्यास गुरूवारपासून दुधाचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

य्याबाबत कात्रज दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.विवेक क्षीरसागर म्हणाले, सोमवारी 65 टक्के दुध संकलन झाले होते. ते मंगळवारी 50 टक्क्यांवर आले आहे. दोन दिवसांतच संकलन कमी होत चालले आहे. सध्या काही प्रमाणात होणारे दुध संकलन आणि शिल्लक साठा यातून दुध पुरवठा सुरू असला तरी आंदोलन सुरू राहिल्यास गुरूवारपासून दुधाची टंचाई जाणवेल.

चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे म्हणाले, आंदोलनामुळे चितळे डेअरीचे संकलन पूर्णपणे बंद आहे. शिल्लक साठय़ापैकी कमी प्रमाणात पुणे शहरात दुधाच्या गाडय़ा पाठविण्यात येत आहेत.

किरकोळ दुकांनामध्ये चितळे डेअरी, वारणा, कृष्णा, गोकुळ दुधसंघासह सोलापुर, नगर भागातूनही पुरवठा कमी झाला. परिणामी शहरात दुधाचा काहीसा तुटवडा जाणवला. किरकोळ दुकानदारांना दुधाची ऑर्डर एक दिवसापुर्वी द्यावी लागते. सध्या दुध डेअऱ्यांकडून दुध पुरवठा कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलन सुरू राहिल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. किरकोळ दुकानदार आहे त्या दरातच दुधाची विक्री करत आहेत.

– सचिन निवंगुणे (अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल क्यापारी संघ)