मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्कारला सिद्धुची अनुपस्थिती

नवज्योत सिंग सिद्धू हे सध्या पंजाबचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आहेत. अनेक वर्ष भाजपमध्ये असलेल्या सिद्धू यांनी गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सामना ऑनलाईन । चंदीगढ

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शुक्रवारी रात्री प्रसिद्धी पत्रक जाहीर करून माहिती दिली होती की पंजाबच्या चार शहीद जवानांच्या अंत्यसंस्कारावेळी चार मंत्री उपस्थित राहतील. मोगामध्ये शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्कारावेळी मंत्री नवज्योत सिंग सिद्धु यांना उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु स्थानिक आमदार आणि पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या येण्याची कुठलीच माहिती त्यांना देण्यात आली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही नवज्योत सिंग सिद्धूंनी शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्कारला हजेरी लावली नाही. मोगाला जाण्याऐवजी ते लुधियानामध्ये एका कार्यक्रमास पोहोचले. या कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. परंतु शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहता ते या कार्यक्रमाला आले.

दहशतवादला कुठलाही देश नसतो अशी टिप्पणी सिद्धूने केली होती, त्यामुळे सिद्धूवर चहूबाजूने टीका झाली होती. परंतु आपल्या वक्त्यव्याचा विपर्यास केल्याचे सिद्दूने लुधियानामध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले. याचाच परिपाक म्हणून कपिलच्या कार्यक्रमातून सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली आहे.