खरोळा येथून अल्पवयीन मुलीस पळवले

82

सामना प्रतिनिधी, लातूर

रेणापूर तालुक्यातील मौजे खरोळा येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या खाडेवस्ती एमआयडीसी बारामती येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध रेणापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रेणापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी लता नितीन कोपे रा. खाडेवस्ती एमआयडीसी बारामती जि. पुणे यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी महिला ही रेणापूर तालुक्यातील मौजे खरोळा येथे एका लग्न समारंभासाठी 20 मे 2019 रोजी आलेली होती. तिच्या सोबत मुलगी आणि मुलगाही आलेले होते. मुलीने नुकतीच 10 वीची परीक्षा दिलेली होती. 23 मे रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलगी दिसली नाही त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या