कुंभारमाठ येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

सामना प्रतिनिधी । मालवण

कुंभारमाठ येथील १६ वर्षीय अल्पवयीन कॉलेज युवती मंगळवार ६ फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता क्लासला जाते असे सांगून ही अल्पवयीन कॉलेज युवती घरातून निघून गेली होती. मात्र ती दिवस उलटून देखील अद्यापपर्यंत घरी न आल्याने तिच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची खबर पोलिसात दिली आहे. याबाबत मालवण पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.