मिसिंग मॅन फॉरमेशन… हवाई दलाची कारगिलमधील शहिदांना श्रद्धांजली

107
tribute-to-air-worrior1

सामना ऑनलाईन । भटिंडा

कारगिल युद्धाला यंदा 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना ‘मिसिंग मॅन फॉरमेशन’ तयार करत अनोख्या रितीने श्रद्धांजली वाहण्यात आली. हिंदुस्थानचे एअर चिफ मार्शल बीएस धनोआ यांनी MIG-21 मधून उड्डाण घेत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

पंजाबमधील भटिंडा येथील हवाई दलाच्या तळावरून विमानांनी उड्डाण घेतले. यावेळी एअर चिफ मार्शल बीएस धनोआ यांनी कारगिल युद्धातील ऑपरेशन ‘सफेद सागर’मध्ये शहीद झालेल्या स्क्वार्डन लीडर अजय आहुजा यांना श्रद्धांजली वाहिली. एअर मार्शल आर. नांबियार देखील या वेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या