टीम इंडियाच वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार! कर्णधार मितालीचा विश्वास

56

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सामना जिंकून देणाऱ्या एकाहून एक सरस खेळाडूंचा भरणा तसेच महेंद्रसिंग धोनीचा अनुभव यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असा विश्वास हिंदुस्थानच्या एकदिवसीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केला.

‘टीम इंडिया’कडे एकहाती सामना जिंकून देणारे अनेक खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू हिंदुस्थानला कोणत्याही परिस्थितीत तारू शकतात. जो संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारेल आणि त्यांचे गोलंदाज हे आव्हान प्रतिस्पर्धी संघाला गाठू देणार नाहीत तोच संघ विजेता होईल. गोलंदाजी आणि फलंदाजीत हिंदुस्थानकडे सक्षम खेळाडू आहेत,’ असे मितालीने सांगितले.

मॅचविनर स्टार खेळाडूंच्या भरण्यामुळे स्वाभाविकपणे हिंदुस्थानी संघच विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्येही विश्वचषक उंचावण्याची क्षमता या संघात आहे.- मिताली राज, महिला वन डे संघाची कर्णधार

आपली प्रतिक्रिया द्या