इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानचे नेतृत्व पुन्हा मितालीकडे

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत 0-3 असा सपाटून मार खाल्लेल्या हिंदुस्थानी महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा आता माजी कर्णधार मिताली राजकडे पुन्हा सोपविण्यात आली आहे. मिताली इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे लढतीच्या मालिकेत हिंदुस्थानचे नेतृत्व करणार आहे. या लढती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 22, 25 आणि 28 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात कर्णधार बदलण्याव्यतिरिक्त कोणताही बदल मात्र करण्यात आलेला नाही.

बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसोबतच इंग्लंड व महिलांचा बोर्ड अध्यक्षीय संघही घोषित केला आहे. वन डे मालिकेआधी अध्यक्षीय संघ 18 फेब्रुवारीला पाहुण्या इंग्लंड महिलांविरुद्ध अभ्यास सामना खेळणार आहे. या लढतीत अध्यक्षीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर स्मृती मंधानाकडे सोपविण्यात आले आहे.

नवी वन डे कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी महिलांनी पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत 2-1 असे पराभूत करीत हिंदुस्थानला मालिका विजय मिळवून दिला होता. त्यानंतर मितालीला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 लढतीत संघात स्थान देण्यात आले नव्हते.

तीन वर्षांनंतर यष्टिरक्षक कल्पनाचे संघात पुनरागमन
महिलांच्या संघात यष्टिरक्षक आर. कल्पना हिने तीन वर्षांनंतर पुनरागमन साजरे केले आहे. 19 फेब्रुवारी 2016 ला कल्पना आपली शेवटची वन डे खेळली होती. तिला न्यूझीलंड दौऱयात निराशाजनक कामगिरी करणाऱया डायलान हेमलताच्या जागेवर संघात स्थान मिळाले आहे.