चला, मोदी सरकारला फेकून देऊया!

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रमुक) अध्यक्षपदी स्टॅलिन यांची निवड करण्यात आली.

काय म्हणाले स्टॅलिन…
केंद्रातील मोदी सरकारकडून देशातील अनेक संस्थांना मोडीत काढले जात आहे. शिक्षण, कला, साहित्य, धर्मावर हल्ले होत आहेत. न्यायसंस्था आणि राज्यपालांच्या नियुक्त्या अस्थिर केल्या जात आहेत. धर्मनिरपेक्षतेचे मोठे नुकसान केले जात आहे. यापुढे हे खपवून घेऊ नका. सरकारला धडा शिकवा, सत्तेवरून फेकून द्या!

वादाला तूर्त विराम, पण मार्ग खडतर
द्रमुकमध्ये राजकीय वारसावरून अलागिरी आणि स्टॅलिन या दोघा भावांमध्ये वाद होता. अलागिरीनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. तूर्त द्रमुकमध्ये वादाला विराम मिळाल्याचे बोलले जाते. पण स्टॅलिन यांचा मार्ग खडतर आहे, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

summary : mk stalin slams modi government