साळींबा ग्रामस्थांकडुन आमदार देशमुखांचा सत्कार


सामना प्रतिनिधी । वडवणी

मुलीची वैद्यकीय शिक्षणाची फि भरता न आल्याने आत्महत्या केलेल्या आईची करूण कहाणी ऐकल्यानंतर साळीबा येथील शितलला मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी बोलुन विशेष राखीव जागा उपलब्ध करत तीची सर्व फि भरणाऱ्या आमदार आर.टी. देशमुख यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

शितलचे पालकत्व स्वीकारलेल्या आमदार देशमुख यांनी बीड येथे शितलला नेऊन तीची 1 लाख 62 हजार 500 रुपये फि भरून शितल व तिच्या आईचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले त्यामुळे सर्व सामान्य जनतेतून ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे म्हणत आ.आर.टी. देशमुख यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. त्याच्या ॠणातुन मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार केशवराव आंधळेंसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.