मी माता-भगिनींची माफी मागतो !

ram-kadam-bjp-mla

सामना ऑनलाईन । मुंबई

‘तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा’ असे बेताल विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांनी अखेर आज माफी मागितली आहे.

राम कदमांवर तत्काळ कारवाई करा! उद्धव ठाकरेंची मागणी

ट्विटरचा आधार घेत त्यांनी ही माफी मागितली आहे.बुधवारी राम कदम यांच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. राज्यातील महिला आयोग, भाज व्यतिरिक्त पक्षांच्या महिलांनी मोर्चे, चप्पल मारो आंदोलन करत राम कदम यांचा निषेध केला होता.

महाराष्ट्राच्या रणरागिणीचं राम कदम यांना ओपन चॅलेंज, सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा

टीकेची झोड उठल्यानंतर राम कदम यांनी माफी मागण्याऐवजी फक्त दिलगिरी व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्यावरील टीका आणखी तीव्र झाली होती. या टीकेमुळेच त्यांना आज माफी मागावी लागली आहे.