‘त्या’ वादग्रस्त पत्राची चौकशी करा, मुरली मनोहर जोशींची निवडणूक आयोगाकडे मागणी

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना लिहिण्यात आलेल्या कथित पत्राची चौकशी करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केली आहे. मुरली मनोहर जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनीर अरोरा यांच्याकडे व्हायरल झालेल्या खोट्या पत्राची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रविवारी जोशी यांनी अडवाणी यांना लिहिलेलं एक कथित पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होते. या पत्रामध्ये मुरली मनोहर जोशी यांनी पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. तसेच घरातील (पक्षातील) लोकांनी आमचा (अडवाणी आणि जोशी) अपमान करून घराबाहेर (पक्षातून) हाकलून लावले आहे, असा आरोप जोशींनी केला होता. पत्र व्हायरल झाल्यानंतर जोशी यांच्या कार्यालयातून याला दुजोरा मिळालेला नव्हता. तसेच एएनआयने देखील हे पत्र खोटे असल्याचे म्हटले होते.

murali-manohar-joshi

आपली प्रतिक्रिया द्या