प्रियंका गांधींना बघण्याच्या नादात शेकडोंचे मोबाईल गुल झाले

12


सामना ऑनलाईन । लखनौ

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सोमवारी लखनौ येथे झालेल्या ‘रोड शो’ मुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्ते भलतेच उत्साहीत झाले आहेत. मात्र यातील काही कार्यकर्ते जेव्हा रोड शोमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपला मोबाईल गायब झाला आहे. जवळपास 50 जणांनी आपले मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. सामान्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवक्ता, काही पत्रकार आणि अधिकाऱ्यांचेही मोबाईल या ‘रोड शो’ मधून चोरीला गेले आहेत.

लखनौ विमानतळापासून सुरू झालेल्या प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे होते. या रोड शोला कार्यकर्त्यांनी जबरदस्त गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत भुरटे चोरही या रोड शोमध्ये घुसले होते. उत्तर प्रदेशातील एकट्या सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात 16 जणांनी मोबाईल चोरी गेल्याची तक्रारी नोंदवली आहे. तर इतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या 50 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या