वंदे भारतमधील दोन हजार प्रवाशांनी घेतला मोदकाचा आस्वाद

गणेश चतुर्थीनिमित्त वंदे भारत ट्रेनच्या तब्बल 1907 प्रवाशांनी उकडीच्या मोदकाचा आस्वाद घेतला आहे. आयआरसीटीसीने गणेश आगमनाच्या दिवशी प्रवाशांना बाप्पाचा प्रसाद म्हणून मोदक देण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये रेल्वेसह आयआरसीटीसीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱया प्रवाशांना रेल्वेने बाप्पाचा प्रसाद म्हणून मोदक द्यावेत, अशी मागणी प्रवाशांनी आयआरसीटीसीकडे केली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्रातून धावणाऱया चार वंदे भारत ट्रेनमध्ये रेल्वेने लंच बॉक्ससोबत मोदकही दिला आहे. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया मुंबई-मडगाव या गाडीत 305, मुंबई-शिर्डी – 796, मुंबई-गांधीनगर 703 आणि मुंबई-सोलापूर या गाडीतील 101 प्रवाशांना मोदकाचा प्रसाद दिला आहे.