पंतप्रधान मोदी इंग्रजीत एक ओळही बोलू शकत नाही, ममता बॅनर्जींची टीका

modi-and-mamata

सामना ऑनलाईन । कोलकाता 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रकारची भाषणे करतात, परंतु त्यांना इंग्रजीत एक ओळ धड बोलता येत नाही’ अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. गेल्या चार वर्षात बॅनर्जी यांनी मोदींवर नेहमीच टीका केली. लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसे बॅनर्जी यांनी मोदींना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. मोदींना एक ओळही इंग्रजीमध्ये बोलता येत नाही म्हणून त्यांना टेलिप्रॉम्पटरची मदत घ्यावी असेही त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मोदी भरपूर ठिकाणी भाषणं देतात, परंतु ते इंग्रजीत एक साधी ओळही स्पष्ट बोलू शकत नाहीत. जेव्हा ते इंग्रजीत बोलतात तेव्हा ते सारखे टेलिप्रॉम्पटरकडे बघत असतात. सर्व माध्यमांना ही गोष्ट माहीत आहे. ते स्क्रीनवर पाहून इंग्रजीतील भाषण देतात आणि जणू काही भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे तसा आव आणतात.”

ममता बॅनर्जी या नरेंद्र मोदीच्या विरोधात आहेत. गुरूवारी त्यांनी आयुष्यान भारत पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नसल्याचे जाहीर केले होते. या योजनेच्या माध्यमातून भाजप पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे.