मोदीच एनडीएच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार, प्रशांत किशोर यांचे वक्तव्य

14


सामना प्रतिनिधी । पाटणा

जनता दल (सं) चे उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर मोठे वक्त्यव्य केले आहे. नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि तेच राहणार असे वक्त्यव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, “नितीश कुमार यांचाही मान मोठा आहे. एनडीएला एकत्र ठेवण्यात त्यांची मोठी भुमिका आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी कुठलीच चर्चा होत नाहिये आणि नाही झाली पाहिजे. मोदीच एनडीएच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील आणि तेच राहतील. नितीश कुमार यांनी दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे. त्यांचे भविष्य चांगलेच असणार. बिहारच्या जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम त्यांच्यावर असेच राहिले तर नितीश कुमार यांचे भविष्य अजून चांगले असेल.”

जेडीयुमध्ये का प्रवेश घेतला यावर किशोर म्हणाले की, “मी बिहारचा आहे आणि इथल्या मातीशी मला घट्ट रहायचे आहे. बिहारसाठी काही करायचे असून बिहारला मी माझी कर्मभूमी म्हणून निवडली आहे.”

आधी 25 आणि आता 17 जागांवर जेडीयुने का निवडणूक लढवली या प्रश्नावर किशोर म्हणाले की, एनडीएमध्ये लोकसभेच्या जागा लढवण्यात आमचा तिसरा किंवा चौथा क्रमांक लागतो. येत्या निवडणूकीत जेडीयुची महत्त्वाची भुमिका असेल.” पाच सात जागा कमी लढत असलो तरी पक्षांतर्गत ताण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या