मोहम्मद गुफरान, काजल कुमारी यांना कॅरम स्पर्धेत विजेतेपद

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवाजी पार्क जिमखान्याने आयोजित केलेल्या अकराव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे मुंबईच्या दुसर्‍या मानांकित मोहम्मद गुफरान, अग्रमानांकित काजल कुमारी यांनी विजेते पद पटकाविले. ही प्रतिष्ठत राज्य गुणांकन स्पर्धा मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने शिवाजी पार्क जिमखाना येथे शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे, मानद कार्यवाह संजीव खानोलकर व मानद सहकार्यवाह सुनील रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला विक्रमी 450 खेळाडूंचा सहभाग लाभला. विजेत्या खेळाडूंना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर सुधीर नाईक यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषकाने गौरविण्यात आले.